डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरस्कृत “एआय: उद्योगातील व्यवसाय विकास आणि विश्लेषणात वापर” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

दर्पण न्यूज रामानंदनगर/ पलूस :- रामानंदनगर येथील
रयत शिक्षण संस्थेचे,
डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर मध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पुरस्कृत
“एआय: उद्योगातील व्यवसाय विकास आणि विश्लेषणात वापर” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे.के जाधव यांनी केले.
कार्यक्रमासाठी बीज भाषक म्हणून डॉ सचिन पाटील विभाग प्रमुख राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर हे उपस्थित होते.
त्यांनी ए आय चा वापर उद्योग व्यवसायात कशाप्रकारे केला जातो व यातून नव्या पिढीने काय साध्य केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. भविष्यात येणाऱ्या संधी व याचा वापर करून विद्यार्थ्यांनी संधीचं सोनं केलं पाहिजे हे सांगितले. त्यांनी एआय बाबत विस्तृत अशी माहिती सांगताना सांगितले भविष्यात आणखी आणखी पुढे जाईल त्यासाठी आपण सजक असणे गरजेचे आहे.
दुसऱ्या सत्रा मध्ये डॉ माधव साळुंखे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा हे उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ए आय टेक्नॉलॉजी आणि डिजिटल प्रणाली वाढलेली आहे. सुरुवातच आहे यासाठी विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून पहावे. उद्योग व्यापार बँकिंग सर्वच क्षेत्रामध्ये याचा वापर झपाट्याने वाढत आहे यात नवीन संधी उपलब्ध होत आहेत हे ज्ञान आत्मसात करावे असे सांगितले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यशाळेचे यशस्वी संयोजन करण्यात आले.
आय क्यू ए सी कॉर्डिनेटर दिनेश ससाने,बीसीए विभाग प्रमुख श्रीमती प्रा नंदा बोराडे, प्रा अर्पिता कदम , प्रा अक्षरा साटपे, प्रा . मोनिका शिंदे, प्रा बी डी पाटील, प्रा. डॉ. अमोल कांबळे, प्रा. प्रियांका जाधव, प्रा. संध्या जाधव, प्रा.शिवानी पाटील, प्रा. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. एन.के.कांबळे यांनी मानले.
सूत्रसंचालन प्रा. शुभांगी लवटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी इतर महाविद्यालयातून प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


