भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने सफाई कामगारांना भेट वस्तू , फराळ वाटप

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने सफाई कामगारांना भेट वस्तू व फराळ वाटप करण्यात आले.
भिलवडी ग्रामपंचायत मधील सफाई कामगारांना भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली.संस्कार केंद्राचे वतीने गेली 22 वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. प्रारंभी साने गुरुजींना अभिवादन करण्यात आले उपक्रमाचे संयोजक आणि संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी उपक्रमाचा हेतू विशद करून गावाची स्वच्छता करणाऱ्या सर्वसामान्य सफाई कामगारांचा सन्मान करण्यासाठी त्यांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले. यावेळी चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीश चितळे, भिलवडीचे आय.ए.एस.अधिकारी माननीय प्रकाश मगदूम सौ वीणा मगदूम यांचे हस्ते सफाई कामगारांना भेटवस्तू व फराळ देण्यात आला. महिला कामगारांना साडी भेट देण्यात आली. यामध्ये प्रदीप उबाळे महावीर वाघमारे नितीन गाडे भागवत कांबळे बाबासाहेब वायदंडे प्रशांत चव्हाण अशोक भोईटे दिनकर कांबळे श्रीमती सुनिता कांबळे सुरेखा कांबळे माधुरी कांबळे सुकुमार भोईटे प्रभाकर कांबळे या सफाई कामगारांना दिवाळी भेट व फराळ तसेच महिला कामगारांना साड्या देण्यात आल्या.कार्यक्रमाचे संयोजन बाळासाहेब माने सर संजय गुरव सर मयुरी नलवडे विद्या निकम, उत्तम कांबळे यांच्यासह संस्कार केंद्राच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून दिवाळी फराळाचे संकलनही केले होते.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख सुभाष कवडे यांनी केले.गेली 22 वर्षे हा उपक्रम संस्कार केंद्राचे वतीने प्रतिवर्षी नियमितपणे सुरू आहे.


