वसगडे येथे अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस यांच्या नव्या शाखेचे उद्घाटन

दर्पण न्यूज भिलवडी/वसगडे:- दीपावली धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शनिवार दिनांक १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस यांच्या वसगडे येथील नव्या शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आला.तत्पूर्वी दीपक पाटील व त्यांची पत्नी सौ दिव्या पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
यावेळी वसगडे गावचे माजी सरपंच श्रेणिक पाटील, सन्मान शिक्षण संस्थेचे बाळासाहेब यादव,सुरज पाटील, संस्थेचे वसगडे शाखा चेअरमन डॉ.सुहास पाटील, उद्योजक संजय जाधव, अमोल शेडशाळे,रमेश पाटील, अरविंद शेडशाळ,अनुप कुलकर्णी, भिलवडी गावच्या माजी सरपंच सीमा शेटे, आशाताई मोहिते,नांद्रे गावचे ग्रामविकास अधिकारी सचिन महिंद पाटील,
यांच्यासह संस्थेचे संचालक,पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत,प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शितल किणीकर यांनी केले.वसगडे शाखेच्या उद्घाटन समारंभ नंतर बोलताना शशिकांत राजोबा म्हणाले की, ध्येय, चिकाटी आणि विश्वास याच्या जोरावर भिलवडी सारख्या ग्रामीण भागातील शितल किणीकर यांनी लहान वयामध्ये अनेक आव्हानांना सामोरे जात, पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये आपले नाव कमावले आहे. त्यांनी अल्पावधीत उत्तुंग भरारी घेत अरिहंत पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ केला आहे. त्यांच्यावर लोकांचा असलेला विश्वास व किणीकर यांचा समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास याच्या बळावर ते आज या उंचीवरती पोहोचले आहेत. अगदी कमी वेळेत संस्थेने तब्बल १४ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे.हि कौतुकास्पद बाब आहे. यावेळी सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब यादव यांनीही संस्थेच्या उज्वल यशोगाथेची माहिती देऊन, शितल किणीकर यांनी सुरुवात केलेल्या अरिहंत अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तिसऱ्या शाखेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूसचे संस्थापक चेअरमन शितल किणीकर यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. महिला बचत गट, लहान व्यापारी, मूजर, सुतार, चहा व्यापारी, किराणा व्यापारी, पान शॉप असे छोटे व्यावसायिक यांना आर्थिक मदत करुन, व्यवसाय वाढीस मदत केली आहे.
बँकींगमधील सर्वोत्तम आणि तत्पर सेवा, अर्थसेवा देण्यासाठी त्यांनी यापूर्वी पलूस तालुक्यातील माळवाडी येथे शाखा विस्तार करून,कर्ज देणे आणि ठेवी स्विकारणे एवढेच उद्दीष्ट न ठेवता ग्राहकांना घरपोच सेवा देणेसाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत.अनुभवी, शिक्षित कर्मचारी वृंद,व्यवहारातील पारदर्शकता,तत्पर सेवा व समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग यामुळे शितल किणीकर यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
शितल किणीकर यांनी स्थापन केलेल्या
अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पलूस व माळवाडी शाखेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्या पार्श्वभूमीवर वसगडे ग्रामस्थांच्या आग्रहास्तव शितल किणीकर यांनी अरिहंत अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शाखा विस्तार करताना वसगडे येथे आपल्या आणखी एका शाखेचा शुभारंभ करून, अरिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.


