आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
रयत शिक्षण संस्था, दि रयत सेवक को-ऑ बँकेच्या सांगली येथील नूतन इमारत बांधकामाचा पहिला मजला स्लॅब कास्टिंग चे पूजन : जे के बापू जाधव यांची उपस्थिती


दर्पण न्यूज मिरज/सांगली :- रयत शिक्षण संस्था व दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा यांच्या संयुक्त मालकीच्या सांगली येथील नूतन इमारत बांधकामाचा पहिला मजला स्लॅब कास्टिंग चे पूजन संपन्न झाले.
स्लॅब वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. जे.के.बापू जाधव, जनरल बॉडी सदस्य मा.एस.वाय. जाधव, विभागीय अधिकारी मा. अशोक शिंदे, सहाय्यक विभागीय अधिकारी मा. अँथोनी डिसोजा, रयत बँक ब्रांच मॅनेजर सुरेश पोळ, संस्था इंजिनिअर श्री. संग्राम महाडिक लालासो महिंद व इतर मान्यवर उपस्थित होते.


