दुधोंडी येथे कृष्णाकाठ सह. दूध व्यावसायिक संस्थेकडून उच्चांकी बोनस, दीपावली भेटवस्तू वाटप
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हैस दुधाला ₹३.५० व गाय दुधाला ₹२.५० प्रति लिटर दर; प्रत्येक उत्पादकाला EVEREADY चार्जिंग बॅटरी भेट


दर्पण न्यूज दुधोंडी/भिलवडी -:
शेतकऱ्यांच्या सहकारभावातून उभी राहिलेली आणि ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी कृष्णाकाठ सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या., दुधोंडी हिने यंदाही आपल्या सदस्य दूध उत्पादकांसाठी उच्चांकी बोनस जाहीर केला आहे.
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा. जे. के. (बापू) जाधव यांच्या प्रेरणेतून व नेतृत्वाखाली या वर्षीचा बोनस आणि दीपावली भेटवस्तू वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.संस्थेने आपल्या सर्व सदस्य दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी डिपॉझिट ₹1 + बोनस ₹2.50 = एकूण ₹3.50 प्रति लिटर आणि गाय दुधासाठी डिपॉझिट ₹1 + बोनस ₹1.50 = एकूण ₹2.50 प्रति लिटर असा लाभ जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचा दर देताना त्यांना उत्सवाचे औचित्य साधून EVEREADY कंपनीची चार्जिंग बॅटरी ही दीपावली भेट म्हणून देण्यात आली.या उपक्रमामुळे दूध उत्पादकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या प्रगतीशील कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमास मीनाक्षीदेवी क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतीकुमार (आबा) जाधव, मानसिंग को-ऑप बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, अंकलखोपचे ज्येष्ठ नेते जे. के. (आप्पा) पाटील, डी. ए. माने, चिचणीचे प्रल्हाद पाटील, अंकलखोपचे अजित शिरगावकर, अँड. दिपक लाड, दुधोंडीचे माजी लोकनियुक्त सरपंच विजय आरबूने, वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे, प्रशांत राठोड, वंसगडेचे नरसगोंडा पाटील, जयपाल सरोटे, गुंडा खोत, माजी उपसरपंच रवींद्र नलवडे, दुधोंडी ग्रामविकास सोसायटीचे माजी चेअरमन हिंदुराव कदम, कृष्णाकाठ दूध डेअरीचे चेअरमन संदीप पाटील, व्हा. चेअरमन प्रशांत चव्हाण, संचालक चंद्रकांत जाधव, हणमंत महाडीक, सिकंदर मुलानी, मिलिंद तिरमारे, सविता तिरमारे, संगीता तिरमारे, सचिव सुनील जाधव तसेच परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसिंग बँकेचे संचालक हनीफ मुजावर यांनी केले.
या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या सामाजिक, सहकारी आणि आर्थिक उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला आर्थिक बळ देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व दूध उत्पादक सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले व भविष्यात संस्थेचा विस्तार आणि उत्पादकांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावी पाऊले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.


