टाकळीभान हायस्कूलला सर्वतोपरी सहकार्य करू ; रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे आश्वासन

दर्पण न्यूज टाकळीभान :- रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी दिले .
अहिल्यानगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब , व्हाईस चेअरमन ॲड . भगीरथ शिंदे ,संस्थेचे सचिव विकास देशमुख ,सहसचिव बी .एन . पवार , उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष दादा काळे,उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे आले असताना त्यांची रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे , विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे, विद्यालयाचे उपशिक्षक आदिनाथ पाचपिंड ,संदीप जावळे यांनी सदिच्छा भेट घेतली .यावेळी टाकळीभान हायस्कूलसमोर असलेल्या विविध प्रकारच्या अडचणी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्यासमोर मांडल्या . टाकळीभान हायस्कूल गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर असून परिसरातील विद्यार्थ्यांचा टाकळीभान हायस्कूल कडे ओघ वाढत आहे . वाढत्या विद्यार्थीसंख्येचा विचार करता भाडेतत्त्वावर असलेली जागा कायमस्वरूपी नावावर व्हावी , बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर व्हावे या मागण्या संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या समोर केल्या . या सर्व प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत टाकळीभान शाखेला रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन चंद्रकांत दळवी यांनी दिले .


