महाराष्ट्रसामाजिक

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

 

   दर्पण न्यूज मिरज/   सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 17 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

———————————————

 

दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश जारी

 

        सांगली-: दिपावली सणाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलासिमा हद्दीत दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर दि. 17 ऑक्टोबर 2025 ते 23 ऑक्टोबर 2025 अखेर पर्यंत पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता, सुव्यवस्था राखण्याकरीता (१) पेट्रोल/डीझेल पंप/ डेपो (ii) गॅस सिलेंडर गोडाऊन (iii) केरोसीन तेलाचे डेपो (iv) फटाक्यांची दुकाने (v) ज्वालाग्रही पदार्थांचे डेपो, (vi) रासायनिक पदार्थांचे डेपो या नमूद ठिकाणापासून 100 मीटर आत फटाके उडविण्यास मनाई केली आहे. शाळा, कॉलेज, रूग्णालये, न्यायालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोन मध्ये येतात, त्या भागात १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. फटाक्याच्या लडी व असे फटाके जे मोठे प्रमाणात प्रदुषीत हवा, आवाज, घनकचरा तयार करतात अशा प्रकारच्याा तत्सम फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे बलून्स, आकाश दिवे/ आकाशाकंदील, ड्रोन आदी आकाशांमध्ये सोडण्यास/ उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजीचे  00.01 वाजल्यापासून ते दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!