महाराष्ट्रसामाजिक

जतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास दोन हेक्टर क्षेत्र जमीन प्रदान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते मुख्याधिकाऱ्यांना आदेश सुपू्र्द

 

दर्पण न्यूज सांगली: स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत जत शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्राप्त असून, या प्रकल्पासाठी जत येथील गट नं. २२/१ मधील उपअधीक्षक भूमि अभिलेख जत यांचेकडील मोजणी नकाशात दर्शविलेले अ-ब-क-ड-ई या अक्षराने दर्शविलेले २ हे. ०० आर क्षेत्र जमीन प्रदान करण्यात आली. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त दत्तात्रय लांघी आदि उपस्थित होते.

मुख्याधिकारी, जत नगरपरिषद यांनी या जागेचे बाजारमूल्यानुसार होणारे मूल्यांकन रू. 15,29,000 इतकी रक्कम तहसीलदार जत यांच्यामार्फत चलनाने शासनजमा करणे अनिवार्य असल्याचे आदेशात म्हटले आहे. आदेश मिळाल्यापासून महिनाभरात हस्तांतरीत जमिनीस कुंपण घालणे / संरक्षक भिंत बांधण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित जमिनीमधील गौणखनिजावरील सर्व अधिकार शासनाने राखून ठेवले असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जत नगरपरिषदेस कचरा प्रक्रिया केंद्र, प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची साठवणूक केंद्र, घनकचऱ्याच्या वाहतूक करणाऱ्या घंटा गाड्या, ट्रॅक्टर-ट्रॉली, जेसीबी, मैला वाहतूक करणारे वाहन इत्यादी वाहनांसाठी वाहनतळ, मृत प्राणी दफनभूमी, भटकी कुत्री निर्बिजिकरण केंद्र, बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन केंद्र यासाठी जागेचा उपयोग होणार आहे.
00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!