मानसिंग को-ऑप. बँक लिमिटेड दुधोंडीकडून पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाचा धनादेश सुपूर्द

दर्पण न्यूज दुधोंडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे
समाजाभिमुख आणि सेवाभावी कार्याची परंपरा जपणाऱ्या मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दुधोंडी या बँकेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. राज्यातील अलीकडील पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला रु. १,००,०००/- (एक लाख रुपये) इतका धनादेश देण्यात आला.हा धनादेश सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य – मा. श्री. दिपक तावरे (सहकार आयुक्त) यांच्याकडे आज पुणे येथे मानसिंग बँकेचे संस्थापक लोकनेते मा. जे. के. (बापू) जाधव, बँकेचे मॅनेजर श्री. हणमंत महाडीक आणि वसुल अधिकारी श्री. विकास कदम यांच्या शुभहस्ते सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना मा. जे. के. (बापू) जाधव म्हणाले की,“मानसिंग बँक नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कार्य करते. संकटाच्या काळात शासनाच्या पाठिशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. समाजहिताच्या प्रत्येक उपक्रमात बँक सदैव पुढाकार घेईल.”


