महाराष्ट्रसामाजिक

कला केंद्र बंद पडले तर कलावंतावर येईल उपासमारीची वेळ ; सांस्कृतिक लोकटनाट्य कलाकेंद्र मालकसंघटनेचे पालक मंत्र्यांना निवेदन

 

 दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे ) :-  सांस्कृतिक लोकटनाट्य कलाकेंद्र मालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा सचिव असून धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 20 वर्षापासून कलाकेंद्र अगदी सुरूळीतपणे चालु होते. कलावंत गेली अनेक वर्षापासून आपली कला दाखवून आपली व आपल्या कुटूंबाची उपजिवीका भागवत आहे. महाराष्ट्र राज्याची परवाना धारक यांच्या सांस्कृतीक कलाकेंद्रावर जे महाराष्ट्र शासनाने कायद्याने जे नियम घालून दिले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करून कलाकेंद्र धारक मालक काम करणारे कर्मचारी काम करत होते. परंतू दि. 20/09/2025 रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये शासनमान्य असलेल्या पारगाव या ठिकाणी असलेली घटना समजुन परवाना धारक एकुण 7 कलाकेंद्र आहेत. खोटी रेड दाखवून नियमाचे उल्लंघन केल्याचे कारण दाखवून भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने सदर गुन्हा दाखल झालेल्या सांस्कृतीक कलाकेंद्राचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांना पाठविलेले आहे. व तसे मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांनी दिनांक 15/08/2025 रोजी तुळजाई कलाकेंद्र पारगाव, तसेच पिंजरा लोकनाट्य केला केंद्र आळणी फाटा, साई लोकनाट्य केला केंद्र आळणी फाटा या लोकनाट्य केला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे. वरिल तीनही लोकनाट्य कला केंद्र केवळ भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे कारण नमुद करण्यात आले आहे. जेंव्हा ती सदरचे गुन्हे आज रोजीपर्यंत न्यायप्रविष्ठ आहेत. सदर रद्द केलेल्या कलाकेंद्रावर एकुण 350 महिला व 50 पुरूष काम करत होते. परवाना रद्द झाल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!