दुधोंडी येथील मीनाक्षी देवी जे के बापू सोसायटीच्या चेअरमनपदी मिलिंद जाधव, व्हाॅ. चेअरमनपदी अनिल आरबुने यांची निवड

दर्पण न्यूज दुधोंडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील मीनाक्षीदेवी जे के बापू नॉन अग्रिकल्चर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी मिलिंद भीमराव जाधव तर उपाध्यक्षपदी अनिल धोंडीराम आरबुने यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे संस्थापक क्रांतीकुमार आबा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्थेने अल्पावधीत नावारूपाला आल्याने या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक ही बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक मानसिंग पाटील यांनी काम पाहिले. संस्थेच्या सन २०२५-२६ ते सन २०३०-३१ या कालावधीसाठी संस्थेच्या पुढील संचालकांची निवड झाली होती यात मिलिंद भीमराव जाधव अनिल धोंडीराम आरबुने, राहुल प्रकाश नलवडे, शंकर रंगराव गावडे, अधिक राजाराम कदम, उल्हास बाबुराव पवार, सतीश लक्ष्मण आरबुने, गौस इब्राहिम मुलाणी, बब्बर कासम मुजावर, सागर माणिक नलवडे, शोभाताई आप्पासो पाटील, शोभाताई राजेंद्र नलवडे, गणेश अर्जुन साठी यांची बिनविरोध निवड झाली होती. नूतन अध्यक्ष मिलिंद जाधव उपाध्यक्ष अनिल आरबुने यांच्यासह सर्व नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक क्रांतीकुमार आबा जाधव, राजेंद्र निवास नलवडे, शहाजी काका जाधव, शंकर जाधव, शरद मोरे, सुजित सुळे, रोहित पवार, वसुंधा रानमाळे, अंकुश थोरबोले सह संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.


