ग्रामीणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार :  जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

 

 

        दर्पण न्यूज भिलवडी/ मिरज/ सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सांगली जिल्हा परिषद 61-निवडणूक विभाग व 10 पंचायत समिती मधील 122-निर्वाचक गणांची आरक्षण सोडत झाली आहे. या आरक्षण सोडतीवर काही हरकती व सूचना असतील तर दिनांक 14 ते 17 ऑक्टोबर 2025 अखेर कार्यालयीन वेळेत संबंधित तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी, सांगली कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा अधिनियम, ५) च्या तरतुदी अन्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांच्या दिनांक 13 ऑक्टोबर 2025 च्या प्रारूप आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, सांगली जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व सर्व पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे.       आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने / हरकती / सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने/हरकती/सूचना इत्यादी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!