कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती साजरी
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड यांची उपस्थिती

दर्पण न्यूज कडेगाव -: महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. महेंद्र (आप्पा) लाड यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण विभागीय अधिकारी मा. अशोक शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, जनरल बॉडी सदस्य र. शि. संस्था सातारा श्री विजय शिंदे, जनरल बॉडी सदस्य श्री. दीपक (शेठ ) भोसले, जेष्ठ स्कूल कमिटी सदस्य श्री. चंद्रसेन (भाऊ) देशमुख, नगराध्यक्ष श्री. धनंजय देशमुखउपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. व्ही. चव्हाण यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. महेंद्र (आप्पा )लाड म्हणाले, “कर्मवीरांच्या त्यागामुळे बहुजन समाजाला शिक्षणप्रवाहात येण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया भक्कम झाला.”
मा. शिंदे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेतील विविध नवनवीन उपक्रमांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होत असल्याचे सांगितले. डॉ. कुंभार यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षणातील महत्त्व अधोरेखित केले.यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी कु. संपदा कांबळे हिने कर्मवीरांच्या जीवनावर प्रभावी भाषण केले. तिच्या उत्कृष्ट वक्तृत्वासाठी विद्यालयाचे हितचिंतक श्री. राजाराम गरुड यांनी तिला ₹५०१ चे बक्षीस देऊन गौरविले. तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जनरल बॉडी सदस्य र.शि.संस्था सातारा मा. पुरुषोत्तम शिवाजीराव भोसले, जनरल बॉडी सदस्य र.शि.संस्था सातारा मा.श्री. विजय लक्ष्मण शिंदे, नगराध्यक्ष श्री. धनंजय (भैय्या) देशमुख , स्कूल कमिटी सदस्य श्री.चंद्रसेन (भाऊ) देशमुख, श्री.राजाराम गरुड, मा. सूर्यवंशी नाना, मा. इन्स्पेक्टर, मा. नगरसेवक श्री नितीन शिंदे,श्रीमंत शिंदे सर, दादासाहेब माळी, सागर सूर्यवंशी, सुनील गाढवे, निलेश लंगडे, सिराज पटेल, मुसा इनामदार, अनिल गोरे, असिफ तांबोळी,अबीद मुजावर,युवराज रासकर,उपमुख्यद्यापक श्री. रोकडे सर, पर्यवेक्षक श्री. भंडारे सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आंबवडे सर, मेश्राम मॅडम यांनी केले.आभार ज्येष्ठ शिक्षक व रयत बँकेचे चेअरमन मा. शेख सर यांनी मानले.