ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
बोरगाव येथे वर्षावास सोहळा व धम्म मेळावा उत्साहात : उद्योगपती सी आर सांगलीकर यांची उपस्थिती

दर्पण न्यूज बोरगाव/ कवठेमहांकाळ : –सांगली जिल्हा कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे वर्षावास सोहळा व धम्म मेळावा उत्साहात पार पडला.
पंचशीलनगर येथील बौद्ध विहार येथे सलग तीन महिने वर्षावास सुरू होता. समारोप कार्यक्रमात प्रारंभी धम्म रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी भदंत यशकाश्यपायन महाथेरो, (जयसिंगपूर) पाली अभ्यासक डॉ. सुगंध वाघमारे, जितेंद्र कोलप, दयानंद कांबळे, रतन तोडकर अभियंता संतोष तायडे, संभाजी माने, सिताराम माने आदीसह बौद्ध बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.