सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार : डॉ विश्वजीत कदम
पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचाराला पाडळी, आसद येथे उत्स्फूर्त प्रतिसाद : युवा नेते सतीश आबा पाटील यांचे धडाकेबाज भाषण

कडेगांव : नेहमीच मी पलूस कडेगांव मतदार संघातील गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला आहे. यापुढेही सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. आपल्या लोकांची साथ मला पाहिजे आहे, 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानावेळी हाता चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्या , असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी पाडळी आसद येथे केले.
यावेळी पलूस तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते सतीश आबा पाटील यांनी धडाकेबाज भाषण केले. ते म्हणाले की, स्व पतंगराव कदम साहेब यांच्या विचाराचा वासरा घेऊन जाणारे पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी नेहमीच समाजकारणाचा विचार करून काम केले आहे. डॉ विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्याचा वाघ नव्हे तर बब्बर शेर आहे. त्यांनी महापूर, कोरोना काळात लोकांना मदत केली आहे, पलूस तालुक्यातून त्यांना पन्नास हजार मताधिक्य मिळणार आहे. त्यामुळे आपणही त्यांना मोठ्या मताधिक्य संख्येने निवडून द्या, असे आवाहन सतीश आबा पाटील यांनी केले.
यावेळी युवा नेते जितेश भैय्या कदम यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी पाडळी, आसद गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या दोन्ही गावांतील तरूणांनी डॉ विश्वजीत कदम, डॉ जितेश भैय्या कदम यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली आणि स्वागत केले. खरोखरच या गावात लोकांचा मोठा उत्साह दिसून आला.