अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी अंकलखोपचा 15 टक्के लाभांश जाहीर

दर्पण न्यूज भिलवडी/अंकलखोप :-
अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी मर्या. अंकलखोप ची 9 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
संस्थेला सभासदांचे विश्वासाच्या जोरावर सन 2024 – 2025 या आर्थिक वर्षात रुपये 1 कोटी 6 लाख इतका निव्वळ नफा झालेचा संस्थापक अध्यक्ष मा. राजेश चौगुले यांनी सांगितले. ठेवीदार व सभासदांचे हित जोपासत सर्वसामान्य माणूस आयुष्यात उभा रहावा. अशा उद्देशाने संस्था नेहमी कार्यरत आहे. संस्था सतत 15 टक्के डिव्हिडंट देत असून, यावर्षीही 15% डिव्हिडंट देत असलेली घोषणा मा. अध्यक्षसो यांनी जाहीर केली.
संस्थेकडे अल्पकाळातच आज अखेर 67 कोटी 16 लाख ठेवी, वसुल भागभांडवल 2 कोटी 15 लाख, निधी 1 कोटी ३६ लाख, गुंतवणूक 17 कोटी 24 लाख, कर्ज 42 कोटी 35 लाख, एकूण व्यवसाय 109 कोटी 51 लाख इतका झालेला आहे. संस्था भक्कम पायावरती उभी आहे.
संस्थेने जिल्हा कार्यक्षेत्र घेऊन आष्टा, दुधगाव, सांगली, वसगडे व इस्लामपूर येथे नवीन शाखा सुरू केल्या आहेत. त्या नवीन शाखांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व शाखा व प्रधान कार्यालय पूर्ण संगणकीकृत असून सुसज्ज आहे. संस्थेने सर्व ग्राहकांना अद्यावत सुविधा SMS, RTGS, NEFT, व क्यू आर कोड ची सुविधा पुरवली आहे.
तसेच संस्थेने शेतकरी बांधवांसाठी अंकलेश्वर कृषी व पशुखाद्य विक्री केंद्र अंकलखोप, आष्टा व वसगडे तसेच हायटेक नर्सरी अंकलखोप येथे सुरू करून माफक दरात खते, बि-बियाने, औषधे व दर्जेदार उस रोपे पुरवण्याची सेवा देत आहे.
संस्थेची शंभर कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू असून लवकरच उद्दिष्ट पूर्ण करीत आहोत. संस्थेने नेहमी 0% एन.पी.ए ठेवण्याची परंपरा जोपासली असून संस्थेला सतत ऑडिट वर्ग “अ” आहे.
सभेचे स्वागत संस्थेचे व्हा. चेअरमन श्री रघुनाथ गडदे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार सौ. अरुणा सूर्यवंशी, श्रद्धांजली श्री आप्पासो सकळे सर, अहवाल व नोटीस वाचन श्री रामगोंडा पाटील तर आभार संस्थेचे संचालक कुंभार सर यांनी केले. यावेळी डॉ. उमेश चौगुले, श्री अरुण सावंत, श्री. विकासराव सूर्यवंशी, श्रीमती मंगल मिरजकर, राजेंद्र मोटकट्टे, सचिन लांडगे, सुभाष चौगुलेसर, सुरेश जोशी, तज्ञ संचालिका सौ. शितल चौगुले व ॲडव्होकेट अभिजीत परमणे, सल्लागार श्री.पंडितराव पाटील ,सौ. वनिता सूर्यवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालक शशिकांत हजारे यांनी केले.