महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

 

 

  दर्पण न्यूज    सांगली : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा दिनांक 3 नोव्हेंबर 2025 असा आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचा टप्पा व टप्पा सुरू करण्याचा / संपविण्याचा दिनांक पुढीलप्रमाणे. प्रारूप आरक्षण – (१) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे – 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत. (२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे – 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत. (३) आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत] – 10 ऑक्टोबर 2025. (४) आरक्षणाची सोडत काढणे [नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत] जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी – 13 ऑक्टोबर 2025. प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करणे – 14 ऑक्टोबर 2025.

            हरकती व सूचना – जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी – 14 ऑक्टोबर 2025 ते 17 ऑक्टोबर 2025.  प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायांसह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे – 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत. प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे – 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत.  अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – 3 नोव्हेंबर 2025.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!