पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा आज कोल्हापूर जिल्हा दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर -अनिल पाटील
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा याप्रमाणे आहे.
आज शनिवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने महासैनिक दरबार हॉल, लाईन बाजार रोड कसबा बावडा कोल्हापूरकडे प्रयाण,
सकाळी 11.00 वाजता महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे आगमन व अनुकंपा व राज्य लोकसेवा आयोगाकडून सरळसेवेने पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती,
दुपारी 1 वाजता शिवाजीराव खोराटे विद्यालय व ज्युनि. कॉलेज सरवडे ता. राधानगरी येथे आगमन व श्री. शिवाजीराव खोराटे यांचा 48 वा पुण्यतिथी दिन सोहळा व श्री दत्त विविध कार्यकारी सह. (विकास) सेवा संस्थेचा 100 वा शताब्दी महोत्सव सोहळ्यास उपस्थिती,
सायंकाळी 5 वाजता गोविंदराव टेंबे राममंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे आगमन व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर यांचे वतीने संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती,
सोईनुसार गारगोटी येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.