नांद्रे येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचे उद्घाटन ; प.पू.मुनिश्री, जिल्हाधिकारी,सिईओ यांची उपस्थिती

दर्पण न्यूज नांद्रे /भिलवडी (प्रतिनिधी) :-
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम शुभारंभ मिरज तालुक्यातील नांद्रे या ऐतिहासिक गावात मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी प.पू.मुनिश्री 108 सारस्वतसागरजी महाराज,प.पू.मुनिश्री 108 जयंतसागरजी महाराज, प.पू.सिध्दसागरजी महाराज, पु.क्षु.श्री.श्रुतसागरजी महाराज, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्यकार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) किरण सायंमोते सौ अश्विनी वरुटे मॅडम सौ वृंदा पाटील उप अभियंता पंचायत समिती मिरज सरपंच सौ.पूजाताई भोरे, उपसरपंच शितल कोथळे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन पै.महावीर भोरे,दिगंबर जिन मंदिरचे अध्यक्ष जिनेश्वर पाटील गा.का.माजी सरपंच राजगोंडा पाटील गुमट,माजी उपसरपंच अमितकुमार पाटील गा.का.विकास सोसायटीचे चेअरमन राहुल सकळे, पोलीस पाटील सौ.स्वातीताई वंजाळे, विकास सोसायटीचे संचालक महावीर पाटील यांच्यासह नांद्रे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,सदस्या, ग्राम अधिकारी सचिन पाटील, महसूल अधिकारी सचिन कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.असिमा मित्रा, वैद्यकीय अधिकारी डॉ.ओंकार ननावरे, दादासाहेब पाटील इंगळे,विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध मित्र मंडळे,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांद्रे ग्रामपंचायत प्रशासनाचे या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्देश संपूर्ण नांद्रेत ग्रामविकासाची चळवळ निर्माण करणे, ग्रामपंचायत सक्षम व पारदर्शक बनवून जलसमुध्द, स्वच्छ,हरीत व सुशासन युक्त पंचायत तयार यावर भर देणे होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रेत या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकचळवळ तयार होईल असा विश्वास सरपंच सौ.पूजाताई भोरे यांनी व्यक्त केला.या निमित्ताने गाव स्वच्छ हरित व समृद्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी नांद्रे येथे उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन करून या अभियानात सहभागी होण्यासाठी आवहान केले.जिल्हाअधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते वुक्षारोपन, व शेती रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.मुख्यकार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते सुर्यगुह, ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण शुभारंभ करण्यात आले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडताना सांगितले की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर सामाजिक न्याय,मनरेगा व उपजीविका विकास या क्षेत्रातील कामांना गती मिळेल.तसेच लोकसहभागातून योजनांचे अभिसरण सुलभ होईल.नांद्रे गावातील सर्व घटकांनी मनापासून या अभियानात सहभाग नोंदविला तर नांद्रे गाव प्रथम येईल असा विश्वास व्यक्त केला.आम्हि जिल्हात प्रत्येक गावात समृध्द पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणार आहोत.ग्रामविकास अभिसरण,योजनांचे प्रभावी उपयोग व ग्रामस्थांच्या सहभागातून हरित, स्वच्छ व जलसमुध्द ग्रामनिमितीची दिशा सुनिश्चित करणार आहे .अशी माहिती त्यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, मोबाईलचा वापर कमी व्हावा या करिता जनजागृती करणार आहोत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व अहिंसा दिनाचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2025 रोजी नांद्रे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची सुरुवात केली. मुख्यमंत्री समुध्द पंचायत राज अभियान अंतर्गत वुक्षारोपन, प्रधानमंत्री सुर्यगुह योजनेतून 25 घरांना सोलर लाईट उद्घाटन, ग्रामपंचायत कडून मोफत ईव्ही चार्जिग स्टेशन उद्घाटन व ग्रामपंचायत इमारत नूतनीकरण शुभारंभ आहे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने अभियानाची सुरुवात झाली. या प्रसंगी प.पू.मुनिश्री 108 सारस्वतसागरजी महाराज,
प.पू.मुनिश्री 108 जयंतीसागरजी महाराज,
प.पू.सिध्दसागरजी महाराज,
पु.क्षु.श्री.105 श्रुतसागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिंसा, व्यसनमुक्ती व समृद्ध गाव या विषयावर प.पू.मुनिश्री 108 सारस्वतसागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले.या मंगल प्रवचनात प.पू.मुनिश्री 108 सारस्वतसागरजी महाराज यांनी नांद्रे गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत नांद्रे गाव नसून नांद्रे हेच माझे घर आहे असे समजून काम केले तर देशात नव्हे तर जगाच्या नकाशावर नांद्रे गावाचे नाव होईल असा विश्वास व्यक्त केला.आपले जिवन विशाल बनवायचे असेल तर मानवजात व पशुपक्षी वर मनापासून प्रेम करा.अहिंसाच मानवाला विशाल बनवू शकते.प्रत्येक व्यक्तीत परमेश्वर बघून व्यवहार करा.विशाल दुष्टीकोन ठेवून मानव सेवा करा.आपले विचार स्वच्छ असले पाहिजेत.सर्वात महत्वाचे गाव डॉल्बी मुक्त करा.टिव्हि, मोबाईल पासून अलिप्त व्हा.आसे मंगल विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून दिले.अहिंसा, व्यसनमुक्ती व समृद्ध गाव यासाठी आपण सर्वांनी मनापासून काम करून नांद्रे गावाचे नाव सातासमुद्रापार पर्यंत पोहचवा.सरपंच भोरे आणि नांद्रे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या अभियानात नांद्रे करांनी मनापासून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजाला दिशा देण्याचे काम माध्यमातून जास्त प्रभावशाली होत आसते, त्याकरिता दैनिक तरुण भारत चे पत्रकार महेबुब मुल्ला हे काम करत आहेत.त्यांच्या कार्यास मुनिश्रीचे शुभ आशिवाद लाभत आहेत.
प.पू.मुनिश्री 108 सारस्वतसागरजी महाराज यांनी आपल्या मंगल प्रवचनात विविध विषयाला स्पर्श करत उपस्थितांना बोधपर प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
यावेळी कुषी सहायक अधिकारी अर्चना गौतम वाघमारे मॅडम यांनी महाडिबीटी अंतर्गत 150 योजनांच्या माध्यमातून नांद्रे गावातील 1200 नागरिकांना दोन कोटीचे अनुदान,900 शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ,30 लाख पर्यंतचा अतिवृष्टी व महापूराचा लाभ, 25 ते 30 लाखांचे यंत्र सामुग्री वाटप,300 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणले, रोपवाटिका,बी बी यांचे,औषध आदी बाबत पाच कोटीचा निधी नांद्रेतील शेतकऱ्यांना मिळाला.चालू अतिवृष्टीमध्ये 60 हेक्टर 24 आर बाधित क्षेत्राचे पंचनामे करून जवळपास 10 लाख 24 हजार 80 रुपये चे नुकसान भरपाई साठि शासनाकडे प्रस्ताव पाठवून आज रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले.या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बद्दल नांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 102 रुग्णवाहिका चालक तोहीद महेबुब मुल्ला यांनी नांद्रे व परिसरातील अनेक अपघातग्रस्त रूग्ण, अनेक सर्पदंश रूग्णांचे तसेच हजारो सर्वसामान्य डिलिव्हरी पेशन्ट, कावीळ झालेले बाळ, आदी रुग्णांना वेळेत तत्परतेने 24 तास सेवा देत रुग्णांवर वेळीच निदान व उपचार करण्यात आपल्या समर्पित सेवा दिल्याने बहुतांश रूग्णांचे प्राण वाचविले आहे. रुग्णसेवेच्या संलग्न क्षेत्रातील भरीव योगदानामुळे नांद्रे व परिसरातील नागरिकांना मौलिक लाभ झाला आहे.त्यांच्या या बहुमुल्य रूग्णसेवेच्या समर्पित कार्यप्रितीयार्थ उल्लेखनीय कार्याबद्दल नांद्रे ग्रामपंचायत नांद्रे घ्या वतीने सरपंच सौ.पूजाताई भोरे, दिगंबर जैन मंदिर नांद्रेचे अध्यक्ष जिनेश्वर पाटील गा.का.व सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
सरपंच सौ.पूजाताई भोरे, उपसरपंच शितल कोथळे,ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सचिन पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, सर्व कर्मचारी यांनी गेली आठ दिवस अहोरात्र मेहनत व कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.आभार ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ ढाले ऊर्फ जे.के.बापू यांनी मानले.यावेळी हजारो महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.