ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक
सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्याकरिता सांगलीतून पथक रवाना

दर्पण न्यूज सांगली : सोलापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजनक परिस्थिती हाताळण्याकामी एकूण 10 व्यक्तीचे अतिरिक्त पथक आज सोलापूरकडे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पथकास आपत्तीबाबतचे शोध व बचाव बाबत मार्गदर्शन करून सदर पथकास हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी तहसिलदार (सर्वसाधारण) लीना खरात, प्रभारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विजय ढेरे, रफिक नदाफ आदी उपस्थित होते.
या पथकामध्ये स्वंयस्फुर्त आपदा मित्र प्रशांत संभाजी माने, संग्राम नायकु यादव, श्रीकांत ठिगळे, चेतन भिलवडे, सचिन शेगुणशे, अजित भिलवडे, हरिशचंद्र पाटील, संतोष आंबी, मोहसीन शेख,सुरज चव्हाण सामील झाले आहेत.