खटाव येथे महाराष्ट्र शासन महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर , प्रांताधिकारी शिवाजी जगताप, पलूस तहसिलदार दीप्ती रिठे यांची उपस्थिती,

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत सांगली जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर , प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या उपस्थितीत खटाव येथे विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी लक्ष्मीमुक्ती जिवंत 7/12, वारस नोंदी इत्यादी योजनांचे आदेश लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी ग्रामस्थांना दिली.
खटाव गावच्या लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला. याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी खांडेकर यांनी तहसिलदार पलूस दीप्ती रिठे , महसूल विभाग पलूस व ग्रामपंचायत खटाव यांचे अभिनंदन केले. जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी एम.एस.ई.बी. सब स्टेशन येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वागत कनिष्ठ अभियंता राजमाने साहेब यांनी केले.
या कार्यक्रमास खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच ओंकारदादा पाटील,उपसरपंच श्रीकृष्ण पाटील,माजी उपसरपंच शिवाजी पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, मोनिका पाटील,. सुरेखा पाटील, सुविद्या चौगुले, रुपाली कर्नाळे, मंडल अधिकारी आण्णासाहेब हांगे, ग्राममहसूल अधिकारी पूजा सूर्यवंशी,ग्रामसेवक रवींद्र गायकवाड,वैद्यकीय अधिकारी सचिन मगदूम, पशूवैद्यकीय अधिकारी संदीप भिंगारदेवे यांच्यासह दीपक पाटील, शशिकांत पाटील, सर्व योजनांचे लाभार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.