आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : कृषीमंत्री  अॅड. माणिकराव कोकाटे

 

 

 

 मुंबई  कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री अॅड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषीमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

             कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावलेउपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराडउपसचिव प्रतिभा पाटीलउपसचिव अंबादास चंदनशिवेउपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!