पणजी येथे 30 सप्टेंबरला डाक अदालत

दर्पण न्यूज सांगली : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. या अदालतीसाठी तक्रार स्विकारण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2025 असल्याचे सांगली डाकघर विभागागचे प्रवर डाक अधिक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तु/मनी ऑर्डर / बचत बँक खाते इत्यादीबाबत तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. संबंधितांनी ज्या अधिकाऱ्या मूळ तक्रार पाठविली असूल त्याचे नाव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून दोन प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस, पोस्टमास्टर जनरल, गोवा रिजन, पणजी 403001 या पत्त्यावर पाठवावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे