समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होण्याचा भिलवडी येथे निर्धार
विस्ताराधिकारी दिनेश खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन ; ग्रामसभेत महिलांचा मोठा सहभाग

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस -: महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या समृद्ध पंचायतराज अभियानाचे भिलवडी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. तर या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी राहण्याचा भिलवडी येथील नागरिकांनी निर्धार केला असून या ग्रामसभेत महिलांचा मोठा सहभाग होता. या अभियानाचा शुभारंभ प्रसंगी विस्ताराधिकारी दिनेश खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
विस्ताराधिकारी दिनेश खाडे यांनी सांगितले की, या अभियानात लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. भिलवडी गाव विकासासाठी कामी नेहमी कार्यरत असते. शासनाने या अभियानासाठी बक्षिसपात्र गावांना ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस तालुक्यासाठी स्वनिधीतून तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी राजेश कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रमास भिलवडीच्या सरपंच शबाना मुल्ला, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे, तलाठी सोमनाथ जायभाय, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.