विवान सोनी, वेदांत कुंभार, विवेक पोवार अजिंक्य ; अभय भोसले, स्वरूप साळवे, प्रवीण गुरव उपविजेते तर श्रवण ठोंबरे, सुजय शिकलगार, गणेश कुर्ले तृतीया स्थानी

कोल्हापूरः अनिल पाटील
आयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 14 17 व 19 वर्षाखालील मुलांच्या शालेय शासकीय जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी चेस असोसिएशन कोल्हापूर यांनी संयोजकांना तांत्रिक सहकार्य केले तर युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील यांनी हॉल देऊन सहकार्य केले. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातून 14, 17 व 19 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात निवड झालेले 174 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रत्येक गटात एकूण सहा फेऱ्यात ही स्पर्धा घेण्यात आली. अंतिम सहाव्या फेरीनंतर प्रत्येक गटातून निवडण्यात आलेले बुद्धिबळपटू पुढीलप्रमाणे *चौदा वर्षाखालील मुले* 1) विवान सोनी शिरोळ 2) अभय भोसले शिरोळ 3) श्रवण ठोंबरे करवीर 4) श्रेयस पाटील गडहिंग्लज 5) अमेय कर्वेकर हातकणंगले *सतरा वर्षाखालील मुले* 1) वेदांत कुंभार शिरोळ 2) स्वरूप साळवे गडहिंग्लज 3) सुजल शिकलगार शिरोळ 4) सोहम पाटील हातकणंगले 5) समर्थ पाटील गडहिंग्लज *एकोणवीस वर्षाखालील मुले* 1) विवेक पोवार पन्हाळा 2) प्रवीण गुरव गडहिंग्लज 3) गणेश कुर्ले कागल 4) मुआज पीरजादे कागल 5) अथर्व पाटोळे शिरोळ. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक क्रीडा अधिकारी सोनल सावंत, चेस असोसिएशन कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, मुख्य स्पर्धा पंच रोहित पोळ, अभिजीत चव्हाण, आदित्य आळतेकर, श्रुती कुलकर्णी, संतोष रसाळ, सुनील राजमाने सर, संगीता खोत व विनायक सुतार यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले..