पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर ःअनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा आजचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन हॉल, स्वामी विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण.
सकाळी 11 वाजता शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन हॉल, स्वामी विवेकानंद कॉलेज नागाळा पार्क कोल्हापूर येथे आगमन व सामाजिक सक्षमीकरण शिबीर च्या माध्यमातून दिव्यांगांकरीता भारत सरकारच्या एडिप योजने अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरण वाटप कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी 5 वाजता दसरा चौक मैदान कोल्हापूर येथे आगमन व भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अश्वघोष आर्ट अॅण्ड कल्चर फाउंडेशन आयोजित हम भारत के लोग संविधानाचा महाविश्वविक्रम कार्यक्रमास उपस्थिती.
सोईनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.