क्रीडामहाराष्ट्रसामाजिक
धाराशिव पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
पोलिसाच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा त्यांची शारीरिक क्षमता उंचवावी या उद्देशाने धाराशिव पोलीस दलात दि 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारोप पोलीस मुख्यालयातील क्रीडांगणावर श्री किर्ती किरण पुजारी जिल्हाधिकारी धाराशिव श्री मैनक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव जिल्हा परिषद श्रीमती भाग्यश्री पाटील दिवानी न्यायाधीश वरिष्ठ विभाग तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या हस्ते संपन्न झाला मा पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांसह पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार श्री दराडे राखीव पोलीस निरीक्षक श्री पठाण यांच्या सही इतर अधिकारी पोलीस खेळाडू उपस्थित होते