पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोमवारी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली/मिरज -: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर, २०२५ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता स्वावलंबी भारत अभियान, सांगली आयोजित कौशल्य विकासातून उद्योजकता भारत २०४७ या विशेष व्याख्यानमालेस उपस्थिती. स्थळ – वेलणकर हॉल, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. दुपारी १ वाजता विविध शासकीय बैठकांसाठी राखीव. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली. ३ वाजता दिव्यांग युडीआयडी (UDID) प्रमाणपत्र वितरण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ – जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली.३.४५ वाजता विविध शासकीय बैठकांसाठी राखीव. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली. ४.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथे आगमन व राखीव.रात्री ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह, मिरज येथून वाहनाने मिरज रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. ९.४५ वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव.९.५५ वाजता मिरज येथून रेल्वेने मुंबईकडे प्रयाण.