राहुलदादा महाडिक सामाजिक संस्थेच्या वाळवा येथील होड्यांच्या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांची उपस्थिती

दर्पण न्यूज वाळवा :-सांगली जिल्हा बँकेचे संचालक .राहुल दादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा येथील राहुलदादा महाडिक सामाजिक संस्थेच्या वतीने वाळवा येथे कृष्णा नदी पात्रात होड्यांच्या भव्य शर्यती भरवण्यात आलेल्या होत्या. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी वाळव्याचे युवा नेते गौरव नायकवडी, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार .धैर्यशील दादा माने,जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, भाजपा जिल्हा अध्यक्ष .सम्राट महाडीक बाबा,तसेच माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
यावेळी वाळवा या क्रांतीभूमी मध्ये नवीन खेळाडू तयार व्हावे म्हणून बोटिंग क्लब होणेसाठी मागणी केली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील,आष्टा मंडल भाजपा अध्यक्ष अमोल पडळकर,ईश्वरपूरचे माजी नगरसेवक सतीशदादा महाडिक, ईश्वरपूरचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल,वाळवा गावचे लोकनियुक्त सरपंच .संदेश कांबळे,इसाक वालंडकर,आर,एम,बागडी,तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.