जर्मन दौऱ्यावरून आल्याने उद्योजक गिरीश चितळे यांचा सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्यावतीने सन्मान

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे अध्यक्ष चितळे समूहाचे संचालक उद्योजक गिरीश चितळे नुकताच जर्मन देशाचा दौरा करून आलेले आहेत
या निमित्ताने वाचनालयामध्ये त्यांचा स्वागत समारंभ आणि व्याख्यान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
मी पाहिलेला जर्मन देश या विषयावर गिरीश चितळे यांनी सुमारे एक तासभर रंजक माहिती सांगितली जर्मनीचे राहणीमान जीवनशैली प्रेक्षणीय स्थळे शिक्षण व्यवस्था, प्रवास व्यवस्था इत्यादी बाबत त्यांनी माहिती सांगितली. तसेच अनेक श्रोत्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांचीही उत्तरे या ठिकाणी देण्यात आली जर्मन दौरा यशस्वी करून आल्याबद्दल श्री गिरीश चितळे आणि सौभाग्यवती लीना चितळे वहिनी यांना वाचनालयाचे वतीने ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कार्यवाहक सुभाष कवडे यांनी केले. संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे मुख्य लेखणी विद्या निकम सभासद गजानन माने यांच्यासह अनेकांनी केले. उपाध्यक्ष डी आर कदम विश्वस्त जीजी पाटील वाचनालयाचे सर्व संचालक वाचक जाहीर ग्रुपचे अध्यक्ष महावीर चौगुले ,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अतिशय रंजक आणि उद्बोधक व्याख्यानाने उपस्थित सर्वच श्रोते भारावून गेलेले होते.