महाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांचे सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे स्वागत

दर्पण न्यूज इस्लामपूर/ सांगली -: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सन्माननीय सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे साहेब यांचं सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे स्वागत करण्यात आले.
तसेच सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीची शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,आर्थिक, महामंडळ योजना याबाबत प्रश्न व अडीअडचणी याबाबत चर्चा करण्यात आली .यावेळी सदर विषयावर गांभीर्यपूर्वक विचार करून त्या सोडवण्याबाबत लोखंडे साहेबांनी आश्वासित केले.
यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.डॉ .सुशील गोतपागर,तक्षशिला ज्ञान केंद्र चे अध्यक्ष अवधूत कांबळे,वंचित चे नेते राजू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कांबळे, यशवंत धुमाळ ,कुणाल कामत, वीरेंद्र राजमाने, सचिन वाडेकर यांचेसह शिष्टमंडळात प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..