तेर येथील जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :-
तेर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला. यात नागरिकांनी सहभागी होवून आपल्या समस्या मांडल्या. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी येत असलेल्या अडचणी, निराधार व अपंग व्यक्तींना मानधन, गावातील रस्ते व अन्य विकासकामे, शेतरस्ते, किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्नांचा समावेश होता. या प्रश्नांचे निराकरण करणेसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.यावेळी माजी सभापती श्री.दत्ता देवळकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा प्रीती कदम, उषाताई यरकळ, सिमा वाकुरे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्री.श्रीमंत फंड, ग्राम महसूल अधिकारी श्री.प्रशांत देशमुख, कृषी सहाय्यक श्री.राम शिंदे, ग्राम अधिकारी श्री.लाडे, श्री.भास्कर माळी, श्री.नवनाथ नाईकवाडी, श्री. बालाजी पांढरे, श्री.जूनेद मोमीन, श्री.मंगेश फंड, श्री.सुमेध वाघमारे, श्री.सुभाष कुलकर्णी, श्री.अमोल कस्तुरे, श्री.तानाजी बंडे, श्री.इर्शाद मुलाणी, श्री.गणेश फंड, श्री.बिभीषण लोमटे, श्री.अर्शद मुलाणी, श्री.सोमनाथ माळी, श्री.विशाल गोरे, श्री.विवेकानंद नाईकवाडी, श्री.नवनाथ पसारे. श्री.अजीत कदम, श्री. प्रतीक नाईकवाडी, श्री.प्रवीण साळुंखे, श्री.राम कोळी, श्री.अभिमान रसाळ, श्री.किशोर काळे आदी सह नागरिक, महिला उपस्थित होत्या.