टाकळीभान हायस्कूलच्या सुप्रिया कदम, साईराज कदम यांची क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

टाकळीभान : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , अहिल्यानगर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या , टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी कु . सुप्रिया प्रसाद कदम आणि साईराज अजित कदम यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम . शिंदे यांनी दिली आहे .
नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती शैक्षणिक संकूल येथे नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा संपन्न झाल्या .या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटामध्ये कु . सुप्रिया प्रसाद कदम हिने द्वितीय क्रमांक तर साईराज अजित कदम याने तृतीय क्रमांक संपादन केला आहे . त्यामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्याचबरोबर कु . सुप्रिया कदम हिने बॉल बॅडमिंटन या खेळप्रकारात महत्वपूर्ण कामगिरी केल्यामुळे राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची अहिल्यानगर संघात निवड झाली आहे .त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे ,टाकळीभान सोसायटीचे चेअरमन व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मंजाबापू थोरात , स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे ,टाकळीभानच्या सरपंच सौ. अर्चनाताई रणनवरे,टाकळीभान पत्रकार संघ व पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमींनी अभिनंदन केले आहे . दोन्ही स्पर्धकांना विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे ,पर्यवेक्षक एस . एस . जरे , क्रीडाशिक्षक एस .एस . राठोड , बी . व्ही. देवरे आदींचे मार्गदर्शन लाभले .