महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे ; धाराशिव जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची मागणी

दर्पण न्यूज ( धाराशिव प्रतिनिधी संतोष खुने) ;
धाराशिव जिल्हा
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओहाळ व जिल्हा अध्यक्ष मा.विद्यानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर बुद्धगया येथील महाबोधी विहार कायदा 1949 रद्द करून महाबोधी बौद्ध विहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत गायकवाड जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओहाळ जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे जिल्हा नेते संतोष बनसोडे जिल्हा सचिव लखन ओहाळ कामगार आघाडी चे गौतम कांबळे मुकेश मोटे संदिपान कांबळे आप्पा धावारे रणजीत मस्के सूर्यानंद बनसोडे कुमार वाघमारे अजय इंगळे राहुल माळाळे धीरज कांबळे अमित पेटे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते*