भिलवडी येथील आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालयाचा सातवा वर्धापनदिन उत्साहात



दर्पण न्यूज पलूस /भिलवडी :-
भिलवडी येथील आ. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालयाचा सातवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध प्रश्न घेऊन परिसरातील ग्रामस्थ येथे येतात. त्यांच्या काय समस्या, अडीअडचणी बघून त्यावर येथील जनसंपर्क अधिकारी मार्ग काढत असतात. वर्धापनदिनाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती माजी मंत्री व पलूस कडेगांवचे आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी हे कार्यालय सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू केले. त्याचा उपयोग परिसरातील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने होत आहे. माळवाडी, भिलवडी, धनगाव, बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडी येथील नेते मंडळी व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.


