युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव तत्परतेने दुधोंडी पुलाखालून कुंडलला जाणारा रस्ता चकाचक

पलूस : युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव तत्परतेने दुधोंडी पुलाखालून कुंडलला जाणारा रस्ता चकाचक करण्यात आला. या कामामुळे लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेली ४ ते ५ महिन्यापासून दूधोंडी कुंडल रेल्वे फाटक बंद झाल्याने नवीन रेल्वे लाईनच्या बाजूने नवीन सब वे ब्रीज (अंडरग्राऊंड) मधून कुंडल ला जाणारा रस्ता रामापूर नागराळे या नावाने असणारा रस्त्यावर जोडला गेल्याने, त्या रस्त्यावरून दूधोंडी, पुणदी, नवी पुणदी, नागराळे, तसेच वाळवा तालुक्यातील गावांची वाहतूक सुरू झाली होती, पण त्या रस्त्यावर पलूस ला जाणारी वाहतूक सुरु झाली खरी पण त्या पुलाखालून कुंडल ला जाणाऱ्या रस्त्यावर झाडी झुडपे नी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाला होताच आणि दुहेरी वाहतूक जाण्यासाठीही अडथळा या ठिकाणी निर्माण होत होता. आणि वाहन आलेले किंवा गेलेले समजत नसल्याने अपघात होण्यास कारणीभूत ठरत होता, अनेक दिवस झाले वाहतूक तशीच सुरू होती अनेकांनी बघून पण त्या ठिकाणी दुर्लक्ष होत होते, पण युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव यांनी पलूस पंचायत समितीच्या विभागाखाली येत असल्याने त्या बांधकाम विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी वैभव पाटील (साहेब) यांच्या कानावर ही गोष्ट घातली व लगेच दुसऱ्या दिवशी त्या विभागाकडून जे सी बी च्या साहाय्याने झाडी झुडपी काढण्यात आली, त्यामुळे त्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला व वाहतुकीला सुरळीत होण्यास सोयीस्कर रस्ता झालेने रोजची वाहतूक करणाऱ्या लोकांकडून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे लोक म्हणायला लागलेत “एक फोन, यंत्रणा कामाला, आणि काम मार्गी”.*
*अशी अनेक कामे कृष्णाकाठ ऊद्योग समूहाचे शिल्पकार लोकनेते जे के (बापू) जाधव यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी एका फोन वर मार्गी लावली आहे.