भिलवडी साठेनगर येथील गणरायाचे थाटात विसर्जन

दर्पण न्यूज भिलवडी :-
भिलवडी (ता पलूस ) येथील नवसाला पावणारा एस . वाय . ग्रुप . साठेनगरच्या राज्याचे गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेश मुर्तीचे मोठया थाटा माटात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले .
गेल्या दहा दिवसामध्ये गणेश भक्तांनी विविध सामाजिक उपक्रम सादार केले . लहान मुलांच्या साठी संगीत खुर्ची ‘ शालेय विद्यार्थासाठी चित्रकला स्पर्धा ‘ रेकॉर्ड डान्स ‘ महिलांच्या साठी गौरी गीतांचा खेळ असे विविध उपक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले ‘ आपल्या लाडक्य बप्पासाठी अनेकांनी गोड नैवेदय आणले होते . प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीला बोलावून आरती करण्यात आली . साठेनगरचा राजा हा नवसाला पावणारा श्री गणपाती आसल्याने अनेकांची इच्छा आकांक्षा पुर्ण झालेल्या गणेश भक्तांनी नवस फेडून घेतले तर अनेक गणेश भक्तांनी आपले नवस बोलून श्रीचे मनोभावे दर्शन घेतले . यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती . अनेकांनी परगाव वरून येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले . अश्या भक्ती मय वातावरणात आपल्या बप्पाचे वसर्जन गणेश भक्तांनी मोठया उत्साहात केले .
या वेळी भिलवडी गावचे सरपंच शबाना हरूनरशीद मुल्ला ‘ माजी सरपंच विद्याताई पाटील ‘ रेश्मा मुल्ला ‘अहमद मुल्ला ‘ चंद्रकांत पाटील ‘दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासो काका मोहिते ‘ मोहन नाना तावदर ‘जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बि ‘डी .पाटील , सनी यादव ,भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे ‘माजी उपसरपंच शहाजी गुरव ‘तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासो मोहिते ‘ जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे ‘इस्लामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संकेत पाटील ‘भिलवडी सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक संजय मोरे ‘ भिलवडी सेकंडरी स्कूलचे सहाय्यक शिक्षक केंगार सर ,टी एस पाटील ‘पत्रकार अभिजीत रांजणे ‘चंद्रमणी रांजणे ‘शशिकांत राजवंत ‘पंकज गाडे
या सर्व मान्यवरांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी एस वाय ग्रुपच्या युवकांनी मान्यवरांचे स्वागत केले .
चौकट
एस वाय ग्रुप व साठेनगरचा राजा हा गणपती नवसाला पावणारा असून या अगोदर अनेक गणेश भक्तांची बोललेली नवसे पूर्ण झाली असून . या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कृष्णा काठावरील अनेक गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती .नवसाला पावणाऱ्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले .हा गणपती नवसाला पावत असल्याने याचा मोठा अनुभव अनेक गणेश भक्तांना आल्याने याचे महत्त्व वर्षांनुवर्ष वाढतच निघाली आहे .यामुळे हा गणपती पुढील काळात या भागातील एक मोठे आराध्य दैवत ठरेल अशी आशा गणेश भक्तांना आहे .