नांद्रे ग्रामपंचायतीने क्रांतिवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी ठराव घ्यावा : उद्योजक प्रदीप मदने
नांद्रे येथे राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी
दर्पण न्यूज नांद्रे/
भिलवडी :-
आद्य क्रांतिवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी नांद्रे ग्रामपंचायतीच्या वतीने असा ठराव घेऊन शासन दरबारी सादर करावा अशी मागणी उद्योजक प्रदीप मदने यांनी राजे नरवीर उमाजी नाईक जयंती निमित्त नांद्रे येथे केली.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक अभिवादनाने झाली तर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेसह सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजे उमाजी नाईक यांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आली
नांद्रे (ता. मिरज) येथे आद्यक्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती एम.एम. ग्रुप नांद्रे यांनी मोठ्या उत्साहात पार पाडली या वेळेला नरवीर उमाजी नाईक यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
यावेळी प्रदीप मदने म्हणाले की उमाजी नाईक यांनी इंग्रज सरकारशी दोन हात करून स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला जर इंग्रजांनी राजांना फाशी दिली नसती तर दुसरे शिवाजी महाराज म्हणून ते घडले असते. रामोशी समाजातील युवकांनी नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या विचाराचा जागर पुढील काळात करावा.
एम.एम. ग्रुप नांद्रे यांच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर एम एम ग्रुप नांद्रे,ग्रामपंचायत नांद्रे व नांद्रे विकास सोसायटी व जिल्हा परिषद शाळा यांच्यावतीने राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली एम एम ग्रुप नांद्रे यांच्यावतीने राजे नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळेला राजकीय शैक्षणिक युवक वर्ग व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी नांद्रे विकास सोसायटी चेअरमन राहुल सकळे, माजी उपसरपंच अमित पाटील, सोसायटी व्हा.चेअरमन शशिकांत एडके, विकास सोसायटी संचालक अमित पाचोरे, कलगोंडा पाटील, मधुकर यादव, अरविंद कुरणे, श्रेणिक खवाटे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप मदने, जगन्नाथ ढाले,सत्तार मुजावर, रमेश साळुंखे,प्रशिक काकडे रंजना कांबळे,विक्रम मोहिते,सतीश मदने, सुरज मुल्ला, निलेश महाजन, सुरज भोरे, परशुराम कांबळे व सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.