श्रीरामपूर तालुकास्तरीय शालेय कबडडी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान च्या संघाला विजेतेपद

दर्पण न्यूज टाकळीभान :जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद तसेच श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आर . बी . एन .बी . कॉलेज श्रीरामपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कबडडी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या , टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम . शिंदे यांनी दिली आहे .
श्रीरामपूर येथील आर . बी . एन .बी . कॉलेजवर नुकत्याच श्रीरामपूर तालुका स्तरीय शालेय कबडडी स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संघाने अंतिम सामन्यात अशोकनगर येथील रामराव आदीक पब्लिक स्कूलच्या संघावर ४२- १३ गुणांच्या फरकाने विजय संपादन केला . या संघात रितेश बाबासाहेब बोडखे, ओम बालाजी पटारे,शिवम राजेंद्र कराळे , अनिल अशोक भोये,अभय सचिन खंडागळे, ओम बापू रणनवरे, कृष्णा रवींद्र परदेशी, समर्थ विष्णू हेलुडे, यश संभाजी पटारे, ओम विजय पवार ,अर्जुन द्वारकानाथ बोडखे,
श्रेयस संजय डोळळे हे विद्यार्थी सहभागी झाले होते . यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे ,टाकळीभान सोसायटीचे चेअरमन व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मंजाबापू थोरात , स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे ,टाकळीभानच्या सरपंच सौ.अर्चनाताई रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, अनिल पटारे, अजित बोडखे, राहूल कोकणे,किरण बोडखे, वसिम इनामदार, अक्षय थोरात, बालाजी पटारे, रविंद्र गाढे, पंकज जाधव, अजित शेळके, सतिश कांगुणे, गणेश इथापे,संभाजी पटारे,अनिल बोडखे, राम बोडखे, रितेश जाधव ,विजय पवार , अक्षय कोकणे, सुधीर मगर , अमोल चितळे, बाबासाहेब बोडखे, गोरख खुरुद, रणजित बोडखे,नवनाथ खंडागळे , टाकळीभान पत्रकार संघ व पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमींनी अभिनंदन केले आहे .यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे ,पर्यवेक्षक एस . एस . जरे , क्रीडाशिक्षक एस .एस . राठोड , बी . व्ही. देवरे , संदिप जावळे , ओन्ली साई क्रीडा मंडळ, आझाद क्रीडा मंडळ आदींचे मार्गदर्शन लाभले .