माजी मंत्री कै. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाचा ५ रोजी ‘लोकतीर्थ’ वर्षपूर्ती समारंभ ; माजी सहकार मंत्री, आमदार डॉ विश्वजीत कदम
कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ०५ सप्टेंबर, २०२५ ; कार्यालय स्थळ - 'लोकतीर्थ', डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम नगर, वांगी. ता. कडेगाव, जि. सांगली

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस (अभिजीत रांजणे):-
राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, पलूस कडेगांव मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि ताकारी-म्हैसाळ व टेंभू योजनेचे शिल्पकार कै. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘लोकतीर्थ’ वर्षपूर्ती समारंभ या विशेष कार्यक्रमाचे शुक्रवार, दिनांक ०५ सप्टेंबर, २०२५, सकाळी १०.०० वाजता, स्थळ:- ‘लोकतीर्थ’, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी. ता. कडेगाव, जि. सांगली येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले .
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, ‘लोकतीर्थ’ वर्षपूर्ती समारंभाला * प्रमुख अतिथी म्हणून मा.आ. सतेज (बंटी) पाटील,विधिमंडळ गटनेते, काँग्रेस, मा. हर्षवर्धन सपकाळ,अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , मा. आ. विजय वडेट्टीवार,माजी विरोधी पक्ष नेते. सन्माननीय उपस्थिती म्हणून मा. प्रा. डॉ. शिवाजीराव कदम कुलपती, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे. मा. मोहनराव कदम (दादा), माजी आमदार. मा. विशाल पाटील खासदार, * स्वागताध्यक्ष म्हणून मा. आमदार डॉ. विश्वजीत कदम,प्र. कुलगुरु, कार्यवाह, भारती विद्यापीठ, पुणे भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमासाठी आपणांस सस्नेह निमंत्रण करण्यात येत आहे. कार्यालय स्थळ ‘लोकतीर्थ’, डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम नगर, वांगी. ता. कडेगाव, जि. सांगली येथे आहे.