भिलवडी गावच्या सरपंच पदी स्मीता शेटे यांची बिनविरोध निवड

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी गावच्या सरपंच पदी स्मीता शेटे यांची एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.
भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे नेते राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
भिलवडी गावच्या सरपंच पदाच्या निवडीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आज सोमवार दिनांक 23 रोजी भिलवडी ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत स्मिता शेटे यांचा सरपंच पदाच्या निवडीसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भिलवडीच्या सरपंच विद्याताई पाटील यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ग्रामसेवक कैलास केदारी, सर्कल सुरेखा जाधव, तलाठी सोमेश्वर जायभाय यांनी निवडणूक अधिकारी म्हणून यांनी काम पाहिले.
या निवडीवेळी भिलवडी गावातील माजी सरपंच ,माजी उपसरपंच, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते..
( या सरपंच निवडीवेळी मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांची आठवण अनेकांना झाली.)