पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून चाणक्यपुरी विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता लक्ष्मी माधव अपार्टमेंट, फ्लॅट नं. 302, चाणक्यपुरी, सांगली येथे आगमन व श्री. वसंतराव बापूराव यादव यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी राखीव. सकाळी 8.30 वाजता गणेशोत्सवानिमित्त सांगली, मिरज व कुपवाड शहर मनपा क्षेत्रातील घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणरायांच्या दर्शनासाठी राखीव. दुपारी 1 वाजता गृह विभागाकडून 1 मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन व 2 आयसर बस च्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – पोलीस अधीक्षक मुख्यालय, विश्रामबाग, सांगली. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व विविध बैठकांसाठी राखीव. दुपारी 3 वाजता गणेशोत्सवानिमित्त सांगली, मिरज व कुपवाड शहर मनपा क्षेत्रातील घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणरायांच्या दर्शनासाठी राखीव. सायंकाळी 7 वाजता श्री. पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी राखीव, स्थळ – 30 वसंत कॉलनी, मार्केट यार्ड, सांगली. सायंकाळी 7.45 वाजता सांगली येथून विटा, ता. खानापूरकडे प्रयाण. रात्री 9 वाजता महात्मा गांधी शाळा पटांगण, साळशिंगे रोड, विटा येथे आगमन व विट्याचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ विटा येथे दर्शनासाठी राखीव. रात्री 9.30 वाजता आमदार सुहास बाबर यांचे विटा येथील निवासस्थानी राखीव. रात्री 10.15 वाजता विटा येथून पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण.