टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

दर्पण न्यूज टाकळीभान: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे,विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे , पर्यवेक्षक एस.एस .जरे, क्रीडा विभाग प्रमुख एस .एस . राठोड,एस .पी . पटारे, ए .ए . पाचपिंड ,शुभम पवार यांच्या हस्ते महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी बापूसाहेब पटारे म्हणाले की,जीवनात खेळाला खूप महत्व असून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विद्यालयाचा व गावाचा नावलौकिक वाढवला पाहिजे . विद्यालयाचे उपशिक्षक संदिप जावळे यांनी मेजर ध्यानचंद यांनी भारतीय क्रीडा विश्वामध्ये दिलेल्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली . यावेळी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यालयामध्ये भरलेल्या क्रीडा साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात येऊन तिरंदाजी या खेळ प्रकाराचा विद्यालयामध्ये शुभारंभ करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी .व्ही .देवरे यांनी तर आभार एस .पी . कोकाटे यांनी व्यक्त केले .