महापूर : मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 22 ऑगस्ट रोजी सुट्टी

दर्पण न्यूज मिरज/सांगली – : सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस तसेच कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत होणारी वाढ, कोयना व वारणा धरणांचा विसर्ग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामधील तसेच मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना दि. 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवस सुट्टीचे आदेश निर्गमित केले होते. तथापी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 43 फूटापर्यंत वाढ झाली असल्याने दि. 22 ऑगस्ट रोजी मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामधील तसेच मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना एक दिवस सुट्टी जाहीर केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
स्थलांतरीत नागरिकांसाठी निवाऱ्याची सोय म्हणून शालेय इमारती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संभाव्य पूरस्थिती आटोक्यात आहे, तथापी धोका पूर्णपणे टळला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 2 ऑगस्ट 2019 अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावयाचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.