फडणवीसांच्या सूचनेनुसारच छगन भुजबळचं नाव दादांनी मंत्रिमंडळातून कमी केले : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

सांगली : वर्षभरापासून मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विरोध करण्यासाठी व भविष्यकाळात तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री केले जाईल असा तोंडी करार मा.देवेंद्र फडवणीस व मा.छगन भुजबळ यांच्यामध्ये झाला होता ,त्यानुसारच माजी मंत्री व समता परिषदेचे अध्यक्ष ओबीसीचे नेते मा.माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी ओबीसींना एकत्र करून ओबीसीचे नेतृत्व करावे व मनोज दादा जरांगे यांना आव्हान देत राहावे भविष्यात उपमुख्यमंत्री करणार या लाभा पोटी माननीय छगन भुजबळ साहेब यांनी मराठा समाज व मनोज दादा जरांगे पाटील यांना अंगावरती घेतले,परंतु ईव्हीएम च्या जोरावर आलेल्या महायुती सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार गटाकडून मंत्रिमंडळामध्ये वरिष्ठ नेते मधून माननीय छगन भुजबळ यांचं नाव दिलं होतं, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये कायम अशांतता,कुटता, तिरस्कार निर्माण व्हावा यासाठी मा. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात अजितदादांनी दिलेले नाव काढून टाकले. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटातून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा किंवा भाजपमध्ये यावे आणि सर्व ओबीसी समाजाला एकत्र करून मराठा समाजाच्या विरोधात कायम लढत रहावे यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माननीय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान दिले नाही. अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संदेश पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली.