चांदेकरवाङी आणि सोन्याची शिरोली येथील जबरी चोरीचा छङा लावण्यास राधानगरी पोलिसांना यश

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरणाऱ्या शिरोळ तालुक्यातील उमळवाड इथल्या समीर रमजान मकानदार ( वय २३) आणि सार्थक नितीन तिवडे यांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केलाय,पसार झालेल्या आणखी एका संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या अक्काताई तानाजी खोत या ६५ वर्षीय वृद्ध महिला चांदेकरवाडी – बाचणी या रस्त्यावरून चालत जात असताना संशयित समीर मकानदार याने सार्थक तिवडे यांच्यासह अन्य एका साथीदाराच्या मदतीनं दुचाकीवरून पाठीमागून येऊन अक्काताई खोत यांच्या गळ्यातील १ तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र, पाच ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा एकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हिंसडा मारून लंपास केला होता. १३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोन्याची शिरोली इथल्या ७२ वर्षीय वृद्ध महिला रुक्मिणी राऊत ह्या आपल्या पान शॉपमध्ये बसल्या होत्या,संशयितांनी दुचाकीवरून पानशॉपमध्ये जाऊन चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने रुक्मिणी यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे ४२ हजार रुपये किमतींचे मणी मंगळसूत्र हिसडा मारून पळवून नेले होतं. याप्रकरणी राधानगरी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या जबरी चोरीची दखल घेत स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी पो .हे.काँ. कूष्णा खामकर “”पो.हे.काँ शेळके””पोलिस अंमलदार किरण पाटील यांचे पथक तयार करून चांदेकरवाडी , बाचणी,सोन्याची शिरोली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यामध्ये संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते. यातील संशयिताची ओळख पटविण्याच्या काम सुरू असताना कागल पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार युवराज पाटील यांनी संशयित चोरट्यांची माहिती राधानगरी पोलिसांना दिली. राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संशयित समीर मकानदार याला शिरोळ तालुक्यातील उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतलं.पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी करत चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली इथल्या चोऱ्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं केल्या असल्याचं कबुलं केलं. यापैकी सार्थक तिवडे याला ताब्यात घेतलं असून अन्य एका संशयिताचा तपास सुरू आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अधिक तपास राधानगरी पोलिस करत आहेत
ही कारवाई पोलिस अधिक्षक योगेशकूमार गूप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि .संतोष गोरे””पोलिस उपनिरिक्षक आकाशदिप भोसले.”पी. एस. आय प्रणाली पवार””कूष्णा खामकर””शेळके”किरण पाटील आदीनी केली.