तुळजाई कला केंद्रातील अल्पवयीन आरोप ; केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी रिपाइं आक्रमक

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) -: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुका हद्दीत पारगाव टोल नाक्या जवळील तुळजाई कला केंद्र येथे 14 ते वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार होत असल्याचे दिसून येत आहे सदरील कला केंद्रावर बीड जिल्ह्यातून युवक वाम मार्गाने जात आहेत या कला केंद्रामध्ये वर्चस्व वरून भांडणे होतात ही भांडणे आवक्याच्या बाहेर जातात यात धारेदरशास्त्र बंदुकी या हत्याराचा सरसपणे वापर केला जात आहे
कला केंद्र मालकासोबत पोलीसाची मिलीभगत आहे या केंद्रावर डान्स पार्टी मध्ये विक्री अशिलल कार्यक्रम सरस चालतात यामुळे स्थानिक महिला व शाळकरी विद्यार्थ्यावर परिणाम होत आहे या कला केंद्रावर रोजच्या रोज कुठल्याही कारणावरून गोळीबार होत आहे धारेदार शास्त्र चालविणे असे प्रकार होत आहेत बीड मधल्या काही युवकांचे मृत्यू सुद्धा झाले आहेत तरी जिल्हाधिकारी साहेबांनी मागणीकडे लक्ष देऊन द्यावे व कारवाई करण्यात यावी अशी निवेदन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष महेश आठवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले