भिलवडी येथील नागरिकांचे स्थलांतर ; नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू नका, सतर्क रहा
एकमेकांना सहकार्य करा ; एकमेकांना धीर द्यावा ; ज्येष्ठ लोकांच्या प्रतिक्रिया

भिलवडी /मिरज/सांगली :
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील नागरिकांना पाण्याचा जोर पाहून भिलवडी सेकंडरी स्कूल येथे स्थलांतरित केले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी घाबरू जाऊ नका तर सतर्क रहा अशा सूचना प्रशासन दिलेल्या आहेत तर एकमेकांना सहकार्य करा ; एकमेकाला धीर द्यावा, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ लोकांच्यातून येत आहेत.
कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 38 फूट 6 इंच इतकी आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोरे ओसरला असला तरी धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी आज रात्रीपासून वाढत जाऊन उद्या दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी 42 फूट ते 43 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
आज धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना – 95300, धोम – 9862, कन्हेर – 10468, उरमोडी – 4367, तारळी – 3085, वारणा – 34257.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2302925 वर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे