महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील टेलर व्यावसायिकांच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणार ; टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील
कागल तालुका शाखा मुरगुड येथे आयोजित टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या मोफत सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज सांगली/कागल (अभिजीत रांजणे) :-
जग भरात टेलर व्यवसायात चाललेली प्रगती पाहता ग्रामीण भागातील आमच्या टेलर व्यावसायिक बंधू भगिनींची प्रगती झाली पाहिजे. महाराष्ट्र, कर्नाटक नव्हे तर देशभरातील टेलर व्यावसायिकांच्या विकासासाठी खंबीरपणे टेलर वेल्फेअर असोसिएशन पाठीशी उभे राहणार आहे , असे आश्वासन टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील यांनी कागल तालुका शाखा मुरगुड येथे दिले.
टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टेलर बंधू भगिनींनीसाठी मोफत एक दिवसीय सेमिनार कागल तालुका शाखा मुरगुड येथे आयोजित करण्यात आले होते,
बसवराज पाटील म्हणाले, की टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटना महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील टेलर बंधू भगिनींनीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करते. एकाच छताखाली टेलर व्यावसायिकांना सर्व माहिती मिळाली म्हणून देशातील पहिले टेलर एक्झिबिशन भरवले होते. या प्रदर्शनाचा अनेक टेलर व्यावसायिकांना फायदा झाला होता. आमची संघटना शहरांतील टेलर व्यावसायिकांसाठी नाही तर ग्रामीण भागातील महिला आणि बांधवांसाठी कार्यरत आहे. आज टेलर व्यवसायात अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही फक्त टेलर व्यावसायिकांच्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडे वेगळ्या महामंडळाची स्थापना करण्यासाठी मागणी केली आहे. टेलर व्यावसायिकांच्या विकासासाठी आणि संकटकाळी आपले असोसिएशन मदत करते. महापूर, कोरोना काळातील मदत लोक कदापि विसरणार नाहीत. यापुढेही टेलर व्यावसायिकांच्या विकासासाठी खंबीरपणे टेलर वेल्फेअर असोसिएशन पाठीशी उभे राहणार आहे. आपण या सेमिनारमध्ये सहभागी झालात नवीन माहिती मिळाली. इतर टेलर बंधू भगिनींनीसाठी आपण माहिती द्यावी, असेही अध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले.
या सेमिनारमध्ये लेडीज टेलर बंधू-भगिनींसाठी कटोरी ब्लाऊज, कटिंग, फिटिंग प्रिन्सेस कटसाठी सुप्रसिध्द कटिंग मास्टर सांगलीचे कयूम ककेरी यांचे मार्गदर्शन लाभले. जेन्टस् टेलर बंधू-भगिनींसाठी शर्ट, पॅन्ट कटिंग कटिंग मास्टर अरुण पिंपळकर व जे. जे. टेलर्स, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी राज्य सचिव शशिकांत कोपर्डे, बाळासाहेब बोधले, सचिन कुरणे
आनंदा गोते, नामदेव भोकरे, सुजाता कोंडेकर , पदाधिकारी, टेलर बंधू भगिनींनी उपस्थित होत्या.