भिलवडी येथील विजय वावरे यांची पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील विजय सुभाष वावरे यांची पंधरा वर्षाखालील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली आहे.
विजय वावरे क्रिकेट अकॅडमी भिलवडी व पलूस चे क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे यांची संजय बजाज यांच्या प्रयत्नातून बीसीसीआय तर्फे होणाऱ्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या वनडे क्रिकेट ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघाचे फिल्डिंग कोच पदी निवड झाली आहे.
विजय वावरे हे बीसीसीआय व आय सी सी लेव्हल एक क्रिकेट प्रशिक्षक आहेत. तसेंच याआधी सोळा वर्षाखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते.
गेली अनेक वर्षे त्यांनी सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
विजय वावरे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज पोलाइट क्रिकेट क्लब तसेच ज्येष्ठ प्रशिक्षक सागर पेंडुरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.